उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग पहिल्यांदाच देशाबाहेर

बीजिंग: उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच देशाबाहेर गेला आहे. महत्त्वाचे म्हणजे किम जोंग अत्यंत गोपनीयपणे चीन दौऱ्यावर आहे. किमच्या या दौऱ्यावर लक्ष ठेवून असलेल्या विविध तीन सूत्रांच्या हवाल्याने ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.

2011 मध्ये उत्तर कोरियाची सूत्रे हाती घेतल्यानंतर किम जोंग पहिल्यांदाच परदेश दौऱ्यावर आहे. किम जोंग रविवारी आणि सोमवारी चीनची राजधानी बीजिंगमध्ये होता, असे ब्लूमबर्गने म्हटले आहे. यापूर्वी एक उत्तर कोरियाची विशेष ट्रेन चीनमध्ये दाखल झाल्याचा दावा, जपानी मीडियाने केला होता. सुसज्ज अशी ट्रेन उत्तर कोरियातून चीनमध्ये दाखल झाली होती. याच ट्रेनमधून किम जोंग उत्तर कोरियातून चीनमध्ये आल्याचे जपानी मीडियाने म्हटले होते. दुसरीकडे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या दौऱ्याबाबत काहीही माहिती नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, उत्तर कोरिया आणि चीनमधील संबंध आणखी दृढ करण्यासाठी किंम जोंग चीनमध्ये आल्याचं जपानी मीडियाने म्हटलं आहे. उत्तर कोरियात किम जोंग सातत्याने करत असलेल्या क्षेपणास्त्र आणि अणू चाचण्यांमुळे संपूर्ण जग वैतागलं आहे.  मात्र त्याला चीनची फूस असल्याचं अनेकवेळा दिसून आलं. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनला उत्तर कोरियाला जाहिर पाठिंबा देता येऊ शकला नव्हता. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध काही प्रमाणात ताणले होते. त्या पार्श्वभूमीवर किम जोंगचा हा दौरा मानला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील वृत्त वाचण्यात आले ह्यात आस्चर्य वाटण्या सारखे काहीच नाही हि तिसर्या महायुद्धाची सुरवात आहे जिनपिंग हे आता चीन चे सर्वेसेवा झाले आहेत पुतीन हे रशियामध्ये स्थिरावले आहेत डोनाला ट्रम्प रुपी बंदराच्या हातात कोलीत मिळाल्याने अमेरिका सर्वच दृष्टीने अस्थिर बनत आहे आपल्या कुविख्यात लोकशाही देशात जे काही घडत आहे ते आपण पाहतोच आहे ह्या परिस्थीचा फायदा चीन पाकिस्तान मार्फत भारताला त्रास देण्यास व किम जोंग मार्फत अमेरिकेचे पाय ओढण्यास करून घेणार प्रश्न उरला रशियाचा रशियाचे विघटन होण्यात अमेरिकेचा सिहांचा वाटा होता काट्याने काटा काढल्या जात असेल तर रशियाला हवेच आहे वेळच आली तर पाकिस्तानचा घास रशिया घशात घालेल व चीन भारताचा ह्यात अमेरिका देशोधडीला लागेल तेव्हा किम जोंग ह्याची पहिलीच परदेशवारी शेवटची ठरण्याची श्यकता नाकारता येत नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)