उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ऊन चीनच्या दौऱ्यावर?

बीजिंग (चीन) – उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ऊन सध्या चीनच्या दौऱ्यावर असल्याची चर्चा चिनी मीडियामध्ये जोरावर आहे. चीन आणि उत्तर कोरियाच्या सीमेवर तैनात मोठ्या संख्यने पोलीस दल, ज्या ठिकाणी परदेशी नेते निवास करतात त्या बीजिंगमधील गेस्ट हाऊसची वाढलेली सुरक्षा व्यवस्था, त्या भागात वाढलेली अधिकाऱ्यांची आणि वाहनांची लगबग, करण्यात आलेली घेराबंदी आणि उत्तर कोरियाचा कोणी “टॉप’ नेता चीनच्या दौऱ्यावर आल्याची खबर; या साऱ्या गोष्टींवरून किम जोंग ऊन गुप्तपणे चीनमध्ये आल्याच्या चर्चेचे पेव फुटले आहे. मात्र चिनी मंत्रालयाने या बाबतीत कोणतीही अधिकृत माहिती जारी केलेली नाही.

जर किम जोंग ऊन चीनमध्ये आले असतील, तर गेल्या सात वर्षांमध्ये प्रथमच त्यांनी उत्तर कोरियाच्या बाहेर पाऊल टाकले आहे. 2011 मध्ये सत्तेवर आल्यापासून ते उत्तर कोरियाच्या बाहेर पडलेले नाहीत. उत्तर कोरियाचा आजवरचा इतिहास पाहिला, तर त्यांच्या नेत्यांच्या परदेश वाऱ्या नेहमीच रहस्यमय, गुप्त राहिल्या आहेत. किम जोंग ऊन यांचे वडील किम जोंग इल हे देखील चीनचा दौरा अशाच गुप्तपणे करत असत.

किम जोंग ऊन हे ट्रेनने चीनमध्ये आले असावेत असा एक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. उत्तर कोरियाची ट्रेन चीनमध्ये आल्याची माहिती जपानी माध्यमांनी दिली आहे. किम्‌ जोंग ऊन चे वडील किम जोंग इल हे सन 2011 पूर्वी रशिया भेटीत अशाच प्रकारची ट्रेन वापरत असत असे सांगण्यात आले आहे.

कोरियन द्वीपकल्पात असलेला तणाव आणि डोनॉल्ड ट्रम्प व किम जोंग ऊन यांची होऊ घातलेली भेट यांच्या पार्श्‍वभूमीवर किम जोंग ऊन यांच्या चिनी भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)