उत्तर काश्‍मीरमध्ये तोयबाच्या म्होरक्‍यासह दोन दहशतवाद्यांचा खातमा

श्रीनगर – उत्तर काश्‍मीरमध्ये बुधवारी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खातमा केला. त्यामध्ये लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा पाकिस्तानी वंशाचा म्होरक्‍या अबू माझ याचाही समावेश आहे. दरम्यान, सुरक्षा दलांनी मोठेच यश मिळवताना काश्‍मीरमध्ये 12 दिवसांत 18 दहशतवाद्यांना ठार केले.

सोपोरच्या नौपोरा भागात दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानंतर लष्कर आणि निमलष्करी दलांनी दहशतवाद्यांच्या शोधासाठी मंगळवारी रात्री विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेवेळी संबंधित भागात दडलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर अचानकपणे गोळीबार सुरू केला. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. बुधवारी सकाळी समाप्त झालेल्या चकमकीत अबू आणि त्याचा साथीदार अब्दुल माजिद उर्फ समीर मारले गेले.

-Ads-

उत्तर काश्‍मीरातील तोयबाचा म्होरक्‍या म्हणूून अबू 2015 पासून सक्रिय होता. मागील वर्षी फेब्रुवारीत हंदवाडामध्ये लष्करी पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अबू हाच होता. त्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे मेजर सतीश धईया शहीद झाले. त्या हल्ल्यावेळी झालेल्या चकमकीत जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले. त्यावेळी पलायन करण्यात अबू यशस्वी झाला होता. त्यानंतर तो उत्तर काश्‍मीरमधील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी ठरला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)