उत्तर आणि दक्षिण कोरियाची एका नवीन युगाची सुरुवात

गोयंग (दक्षिण कोरिया) – उत्तर आणि दक्षिण कोरियासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा, सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा आहे उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग ऊन आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जेई इन यांची आज ऐतिहासिक शिखर परिषद झाली. उत्तर आणि दक्षिण कोरियाला विभक्त करणाऱ्या पन्मुंजम युद्धविराम संधीतील एका गावात ही शिखर परिषद झाली.

शिखर परिषदेपूर्वी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग ऊन यांनी दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांना हात धरून उत्तर कोरियाच्या हद्दीत नेले आणि नंतर दोघेही पुन्ह असीमा रेषा पार करून पीस हाऊस बिल्डिंगमध्ये शिखर परिषदेसाठी गेले
ही सीमारेषा पार करणे इतके कठीण नव्हते, असे सांगून किम जोंग ऊन पुढे म्हणाले, तरीही ही पार करण्यासाठी मला 53 वर्षे लागली. कोरियन युद्धानंतर दक्षिण कोरियाला भेट देणारे गेल्या 53 वर्षातील किम जोंग ऊन हे उत्तर कोरियाचे पहिलेच शासक आहेत.

ही एका नवीन इतिहासीा सुरुवात आहे असे सांगून किम जोंग ऊन पुढे म्हणाले की आम्ही पूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती होऊ देणार नाही.

किम जोंग ऊन यांनी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि अण्वस्त्र चाचण्या बंद करण्याचे जाहीर केले आहे. त्यांची ही घोषणा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असे दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून्म जेई इन यांनी म्हटले आहे.

दक्षिण कोरियातील विंटर ऑलिम्पिक्‍सने दिलेल्या संधीचा किम जोंग ऊन यांनी पुरेपूर फायदा घेतला. उत्तर आणिओ दस्क्षिण कोरियामध्ये संवाद सुरू झाला.

आजची ही शिखरव परिषदस म्हणजे प्यांग्यॉंग आणि वॉशिंग्टन यांच्यातील शिखर परिषदेची नांदी असल्याचे मानले जात आहे.

उत्तर आअणि दक्षिण कोरियामध्ये ज्या काही चांगल्या घटना घडत आहेत, त्यामागे माझे मित्र शी जिनपिंग यांचा मोठाच वाटा असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. शी जिनपिंग यांच्याविना हे घडू शकले नसते अशी ट्रम्प यांनी टिप्पणी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील वृत्त वाचण्यात आले दूरदर्शनावर वरील सोहळा प्रत्यक्ष पाहात असताना वारंवार मोदी ह्यांनी पंतप्रधानपदाचे पद स्वीकारताना जो भव्यदिव्य सोहळा आयोजित केला होता व वरील सोहळा ह्यात जमीन अस्मानाचा फरक आढळून आला मोदी ह्यांच्या सोहळ्याचे काय परिणाम झालेत व होत आहेत ते आपण पाहातच आहोत आता उत्तर व दीक्षित कोरियात कोणता फरक पडतो हे दिसेलच व त्यावरून ह्या दोन्ही सोहळ्याचे मूल्यमापन करणे शक्य होईल असे वाटते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)