उत्तराखंडमध्ये भाजपला 7 पैकी 5 महानगरपालिका 

डेहराडून – उत्तराखंडमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीमध्ये 5 महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्षांच्या 34 जागा भाजपने जिंकल्या आहेत. या निवडणूकीमध्ये अपक्षांनी अनपेक्षितपणे 23 जागा जिंकल्या आहेत. कॉंग्रेसला अध्यक्ष आणि सभापतींच्या 25 जागांवर विजय मिळाला. तर बहुजन समाज पार्टीला एका जागेवर विजय मिळाला असे राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

उत्तराखंडमध्ये गेल्यावर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीमध्ये भाजपने 70 पैकी 57 जागा जिंकून मोठे यश मिळवले होते. त्यामुळे आपले यापूर्वीपेक्षाही अधिक यश मिळवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात होता. विधानसभा निवडणूकीमध्ये पराभव झाल्यानंतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीमध्ये कॉंग्रेसने मिळवलेले यश लक्षणीय आहे.
एकूण 7 शहरांच्या महापौरपदांपैकी भाजपने डेहराडून, ऋषिकेश, काशीपूर, रुद्रपूर आणि हल्दवाणी या शहरांचे

महापौरपद जिंकले. तर कॉंग्रेसने हरिद्वार आणि कोटवार येथील महापौरपद मिळवले. एकूण 84 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 18 नोव्हेंबरला मतदान झाले होते. त्यामध्ये 7 महानगरपालिका, 39 नगरपरिषदा आणि 38 नगर पंचायतींचा समावेश होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)