उत्तराखंडमध्ये बनावट औषधांच्या कारखान्यांवर पोलीसांचा छापा

रुरकी (उत्तराखंड): उत्तराखंडमध्ये बनावट औषधांच्या तीन फॅक्‍टऱ्यांवर पोलीसांचा छापा मारल्याची माहिती देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहा येथून आलेले औषध विभागाचे अधिकारी आणि हसनपूर ठाण्याच्या पोलीसांनी मिळून ही कारवाई केली आहे. हरिद्वार जिल्ह्यातील रुरकी येथील तीन फॅक्‍टऱ्यांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावांची अँटिबायोटिक्‍स औषधे बनवण्यात येत होती. छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट औषधे, पॅकिंग रॅपर आणि पॅकिंग़ मशीन्सही जप्त केली आहेत, या प्रकरणात पोलीसांनी दोन जणांना अटक केली आहे.

मागील वर्षी राजस्थानच्या टीमने हरिद्वार जिल्ह्यातीलच भगवानपूर इलाख्यातून बनावट औषधांचा मोठा साठा जप्त केला होता. चालू वर्षाच्या मार्च महिन्यात उत्तर प्रदेश औषध विभागाच्या टीमने साडेतीन कोटी रुपयांचा औषधांचा साठा जप्त केला होता. मात्र उत्तराखंड पोलीस विभागाला या प्रकाराची खबरही नव्हती.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नरेश मोहन (मुरादाबाद), आशुतोष मिश्रा (बिजनौर) आणि राजेश कुमार (अमरोहा) या तीन जिल्ह्यांच्या औषध निरीक्षकांची टीम तयार करण्यात आली होती. यांनीच हसनपूर पोलीस ठाण्याच्या पोलीसांसह कारवाई केली. ही बनावट औषधे उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि चंदीगडच्या शहरांमध्ये पाठवली जात होती. या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)