उत्तराखंडमधील राज्यातील सर्व भाविक सुखरुप : पाटील

मुंबई : उत्तराखंडमध्ये दरड कोसळल्यामुळे जवळपास पंधरा हजार भाविक अडकले आहेत. यात महाराष्ट्रातील 102 भाविकांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत होते.दरम्यान, राज्यातील सर्व भाविक सुखरुप असल्याची माहिती पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
औरंगाबादचे 22, उस्मानाबादचे 09 आणि अहमदनगरचे 26 भाविक उत्तराखंडमध्ये अडकले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, हे सर्व भाविक सुखरुप असल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगत या सर्व भाविकांच्या संपर्कात असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सगळ्यांना हॉटेलपर्यंत पोहचवले असून लवकरच ते महाराष्ट्रात परततील असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. या भाविकांबद्दल अधिक माहितीकरिता त्यांच्या नातेवाईकांनी 02472-225618 / 227301 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे. विष्णूप्रयाग परिसरातील हाथी पर्वत भागात हे भूस्खलन झाले असून या भागात सुमारे 15 हजार लोक अडक्‍याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान भूस्खलनामुळे रस्त्यांचे मोठे नुकसान झाले असून दगड मातीचे ढिकारे रस्त्यावर पडल्याने बद्रिनाथकडे जाणारी वाहतूक बंद केली आहे. ही वाहतूक दुपारनंतर पूर्ववत होण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)