उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवाराची इचलकरंजीत आत्महत्या

कोल्हापूर – उत्तरप्रदेश  विधानसभेच्या निवडणूकीमध्ये पराभूत झालेल्या अपक्ष उमेदवाराने येथील शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. अरूणकुमार उमाशंकर उपाध्याय (वय 44, मुळ रा. भीमपूर, ता. बदलापूर, जि. जौनपूर, उत्तरप्रदेश, सध्या रा. आर. के. नगर, सांगली नाका) असे त्यांचे नाव आहे. विधानसभेच्या निवडणूकीमध्ये पराभूत झाल्याच्या निराशेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासामध्ये समोर आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मृत अरूणकुमार उपाध्याय यांनी गेल्या वर्षी झालेल्या उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून “मडियाहू’ या मतदार संघातून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले होते. पण भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली. तरीही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. यात ते पराभूत झाले. या दिवसापासून उपाध्याय नैराश्‍यग्रस्त होते. त्यांचा तणाव दूर व्हावा याकरता वीस दिवसापूर्वी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना  इचलकरंजीत  आणले होते. त्यांचे नातेवाईक आर. के. नगर सांगली नाका परिसरातील सुनिल बळवंत पाटील यांच्या भाड्याच्या घरात राहत आहेत.

काल रात्री उपाध्याय जेवण न करता रात्री आठ वाजण्याच्या सुमारास खोलीमध्ये झोपण्यासाठी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी खोलीमध्ये फॅनच्या हुकाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना उठविण्यासाठी नातेवाईक गेले असता त्यांना उपाध्याय यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिस त्वरीत घटनास्थळी दाखल झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)