उत्तरप्रदेश भाजपच्या अध्यक्षपदी केंद्रीय मंत्री पांडे

नवी दिल्ली -उत्तरप्रदेश भाजपच्या अध्यक्षपदी आज केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री महेंद्रनाथ पांडे यांची नियुक्ती करण्यात आली. ते उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या जागी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळतील. नवी जबाबदारी मिळाल्यामुळे पांडे केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्‍यता आहे.

उत्तरप्रदेशातील भाजपच्या महत्वाच्या ब्राह्मण चेहऱ्यांपैकी एक म्हणून पांडे यांची ओळख आहे. पांडे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करून भाजपने सामाजिक समतोल साधल्याचे मानले जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ठाकूर समाजाचे प्रतिनिधी आहेत. तर मौर्य ओबीसी आहेत. पुढील लोकसभा निवडणुका 2019 मध्ये होणार आहेत. राजकीयदृष्ट्या उत्तरप्रदेश हे देशातील सर्वांत महत्वाचे राज्य मानले जाते. त्यामुळे पांडे यांच्या नियुक्तीला महत्व आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)