उत्तरप्रदेशात संपत्तीच्या वादातून गोळीबार; 3 ठार

शहाजहानपुर – उत्तरप्रदेशात शहाजहानपुर जिल्ह्यात कल्लुमिया दर्ग्याच्या परिसरात गुरूवारी रात्री संपत्तीच्या वादातून दोन गटात झालेल्या गोळीबारात तीन जण ठार झाले तर अन्य काही जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यात इसरार (वय 30), इमरान (35), आणि मुशीर (32) असे तीन जण ठार झाले आहेत.

या चकमकीत सोनू नावाचा युवक गंभीररित्या जखमी झाला असून तोही मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी या घटनेचे वृत्त ऐकून तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक चौकशीत संपत्तीच्या वादातून हा प्रकार झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला असून या भागातील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या दोन गटात नेमका कशाच्या संपत्तीचा वाद होता हे मात्र अजून समजू शकलेले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)