उत्तरप्रदेशात पोलिसांची झाडाझडती 

file photo
अमेठी: उत्तरप्रदेश पोलिसांनी पोलिस दलाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांची झाडाझडती सुरू केली असून कर्तव्यात कसुर केल्याचा आरोप असलेल्या दोनशे पोलिस कर्मचाऱ्यांची सध्या खातेनिहाय चौकशी हाती घेण्यात आली आहे.
राज्याचे पोलिस महासंचालक ओ. पी. सिंह यांनीच आज ही माहिती दिली. ते म्हणाले की पोलिसांनी चांगले काम करावे, कार्यालयीन शिस्त पाळावी आणि पोलिस दलाची प्रतिष्ठा राखावी यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांच्या नियमीत बैठका घ्याव्यात, अशी सुचना सर्व वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. या झाडाझडतीत आत्तापर्यंत दोषी आढळून आलेल्या बारा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे.
कायदा हातात घेणाऱ्या कोणाही कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा अशी सूचनाही त्यांना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)