संग्रहित छायाचित्र

लखनौ – उत्तरप्रदेशात रात्री पुन्हा पावसाने विविध ठिकाणी कहर केला. त्यात आणखी बारा जणांचे बळी गेल्याचे वृत्त आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी मोठी पडझड झाली. अनेक ठिकाणी वीजा कोसळण्याचेही प्रकार घडले. गोंडा आणि कुशीनगर जिल्ह्यात प्रत्येकी तीन जणांचे बळी गेले तर मिर्जापुर जिल्ह्यात दोन आणि भरैच, सीतापुर, मीरत आणि इटावह जिल्ह्यात प्रत्येकी एक जण बळी गेल्याचे वृत्त आहे.

दोन दिवसांपुर्वी झालेल्या पावसांत चौदा जणांचे बळी गेले होते त्यामुळे या आठवड्यात पावसामुळे या राज्यात बळी गेलेल्यांची संख्या आता 26 झाली आहे. काल रात्री एकूण 226 घरे कोसळल्याची नोंद झाली असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. अजूनही या राज्यातील पावसाचा जोर कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)