उत्तरप्रदेशात कॉंग्रेसचे डिपॉझीट जप्त झाल्याचा ते उत्सव साजरा करीत आहेत

केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह यांनी उडवली खिल्ली
जम्मू – उत्तरप्रदेशात झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली, पण तरीही ते या निकालाचा आनंदोत्सव साजरा करीत आहेत. पक्षाचा नामुष्कीजनक पराभव होऊनही आनंदोत्सव साजरा करण्याचे हे जगातले पहिलेच उदाहरण असावे अशी खिल्ली केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह यांनी उडवली आहे.

उत्तरप्रदेशातील गोरखपुर आणि फुलपूर या लोकसभेच्या दोन मतदार संघात भाजपचा पराभव झाला आणि त्या जागा समाजवादी पक्षाने जिंकल्या. पण या निवडणूकीचा आनंदोत्सव कॉंग्रेसचे लोक करीत आहेत. वास्तविक त्यांच्या उमेदवारांच्या तेथे अनामत रकमा जप्त झाल्याची त्याची खंत न बाळगता ते भाजपच्या पराभवाबद्दल आनंद मानत आहेत हे विचीत्र आहे असे त्यांनी म्हटले आहे. जम्मू विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहोळ्याच्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जितेंद्रसिंह यांना विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्‍टरेट प्रदान करण्यात आली.

-Ads-

ते म्हणाले की आज कॉंग्रेसला स्वत:च्या विजयापेक्षा भाजपचा पराभव ही अधिक आनंदाची बाब वाटत आहे. त्यामुळेच ते सध्या उत्तरप्रदेशातील पराभवाचा आनंद व्यक्त करीत असावेत. मतपत्रिकांद्वारे मतदान प्रक्रिया घेण्याच्या कॉंग्रेसच्या सूचनेबद्दल ते म्हणाले की, कॉंग्रेस केंद्रात 10 वर्षे सत्तेवर होती त्यावेळी त्यांना इलेक्‍ट्रॉनिक मतदार यंत्रातील खोट का दिसली नाही. आता तरीही ते जर ही मागणी करीत असतील तर 2019 साली आपला पराभव त्यांनी आधीच मान्य केला आहे असा आरोपही त्यांनी केला. मोदींच्या विरोधात सर्वच राजकीय पक्ष एकवटले आहेत त्या विषयी विचारले असता ते म्हणाले की ही स्थिती आम्हाला अनुकुलच असून मोदींना मिळालेली ती सर्वात मोठी प्रशस्ती आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)