उत्तरप्रदेशात अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

संग्रहित छायाचित्र

कानपुर – उत्तरप्रदेशात एका पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर नवाबगंज येथे दोन जणांनी सामुहिक बलात्कार करून तिचा अन्ववीत छळ केल्याची बाब समोर आल्याने या भागात तणाव निर्माण झाला आहे. यातील आरोपींची नावे हर्षीत तिवारी आणि पवन द्विवेदी अशी असून ते दोघेही 19 वर्षांचे आहेत.

सदर मुलगी आपल्या एका परिचीताकडे जात असताना या दोघांनी तिला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही मुलगी जखमी अवस्थेत तेथे आढळून आल्यानंतर स्थानिक नागरीकांना ही बाब पोलिसांना कळवली. तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात दोन्ही आरोपींना पोलिसांनी त्वरीत अटक केली असून या प्रकरणात तिसराही आरोपी सहभागी असावा असा पोलिसांचा कयास आहे, त्याचा शोध घेतला जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)