उत्तरप्रदेशातील युरिया खतांच्या किंमतीत घट

लखनौ: राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने युरिया खतांच्या किंमतीत घट केली आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार 45 किलो युरिया खताचे पोते आता 299 रूपयांऐवजी 266 रूपये 50 पैशांना मिळेल. 50 किलोची युरियाची बॅग आता 330 रूपयांऐवजी 299 रूपयांना उपलब्ध होईल.

केंद्र आणि राज्य सरकारने सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही सवलत देण्यात आली आहे अशी माहिती राज्य सरकारच्या सूत्रांनी दिली. आत्तापर्यंत बाहेरील राज्यांपेक्षा उत्तरप्रदेशात युरियाच्या किंमती जास्त आहेत. त्या कमी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी वारंवार केली होती त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचे या या सूत्रांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)