उत्तरप्रदेशातील महागठबंधनसाठी अजून आरएलडीला निमंत्रण नाही

लखनौ: उत्तरप्रदेशात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधन स्थापन करण्याचा प्रस्ताव असून त्याची औपचारीक घोषणा शनिवारी पत्रकार परिषदेत केली जाणार आहे. पण त्या परिषदेसाठी अजून राष्ट्रीय लोकदल पक्षाला निमंत्रण मिळालेले नाही अशी माहिती या पक्षाच्यावतीने देण्यात आली आहे. राष्ट्रीय लोकदल या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मसूद अहमद यांनी पीटीआयला सांगितले की आमच्या पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जयंत चौधरी हे सध्या दिल्लीत असून ते उद्या लखनौला येतील. आणि जर त्यांना शनिवारच्या पत्रकार परिषदेसाठी निमंत्रण मिळाले तर ते तेथे उपस्थित राहतील.

या महागठबंधन मध्ये राष्ट्रीय लोकदल पक्षाने सहा जागा मागितल्या आहेत. त्यांना दोन ते तीन जागा यात देण्याची तयारी मायावती आणि अखिलेश यांनी दाखवली आहे. गेल्या बुधवारीच जयंत चौधरी यांनी लखनौ मध्ये अखिलेश यादव यांची भेट घेऊन सुमारे तासभर चर्चा केली होती पण या चर्चेचा तपशील त्यांनी जाहीर केला नाही. उत्तरप्रदेशात लोकसभेच्या एकूण 80 जागा असून त्यातील बागपत, मथुरा, मुज्जफरनगर, हाथरस, अमरोहा आणि कैराना या जागांवर राष्ट्रीय लोकदलाने दावा केला आहे. कैराना मध्ये याच पक्षाच्या तब्बसुम हसन या अलिकडेच लोकसभेवर निवडून गेल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)