उत्तरप्रदेशातील मंत्र्याची पुन्हा योगींवर टीका 

लखनौ: उत्तरप्रदेशातील भाजपच्या मंत्रिमंडळातील सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या कारभारावर जाहीर टीका केली आहे. राज्यात अपंगांसाठी शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी अडथळा आणला असून त्यांनी यासाठीचा निधी रोखून धरला आहे अशी टीका त्यांनी केली आहे. राजभर यांनी नुकतेच योगींना आपल्याला मंत्रिमंडळातून काढूनच दाखवावे असे जाहीर आव्हान दिले होते.

त्यांनी एका ट्विटर संदेशात म्हटले आहे की राज्यात एकूण दीड कोटी अपंग मुले आहेत. त्यांच्यासाठी केवळ 16 शाळा उत्तरप्रदेशातील 75 जिल्ह्यांमध्ये आहेत. आता इतके मोठे विद्यार्थी इतक्‍या कमी शाळांमध्ये कसे सामावले जातील असा सवाल त्यांनी योगी यांना केला आहे. नव्याने त्यांच्यासाठी शाळा सुरू करण्याची गरज आहे, पण योगींनी त्यासाठी निधीच देऊ केला नाही. ही बाब खरी आहे पण ती आपण लोकांपुढे मांडली की लगेच आपल्याला सरकार विरोधी ठरवले जाते असे ते म्हणाले.

कुंभ मेळा आणि राम मंदिरासारख्या विषयांवर कोट्यावधी रूपयांचा खर्च करण्याची सरकारची तयारी आहे पण त्यांना अपंगांसाठी शाळा सुरू करण्यात निधीची अडचण भासते ही बाब दुर्देवी आहे असेही त्यांनी म्हटले आहे. या विषयी राज्याचे अर्थमंत्री राजेश आगरवाल यांना विचारले असता ते म्हणाले की राजभर हे कॅबिनेट मिनीस्टर आहेत त्यांच्या विषयावर मुख्यमंत्र्यांनीच उत्तर देणे संयुक्तीक ठरेल. मला या विषयावर काहींहीं बोलता येणार नाही. कॅबिनेट दर्जाचे मंत्री असलेले राजभर यांच्याकडे मागास वर्गीयांचा विकास आणि अपंग कल्याण ही खाती आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)