बिजनौर – उत्तरप्रदेशात बिजनौर येथील एका खासगी पेट्रोकेमिकल फॅक्‍टरीत सकाळी एक स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत किमान सहा जण मरण पावल्याचे वृत्त आहे. ठार झालेले सहाही जण त्याच फॅक्‍टीत काम करणारे मजुर आहेत.

अद्याप एका मजुराचा पत्ता लागेला नाही. तोही तेथेच काम करीत होता. फॅक्‍टरीचा बॉयलर दुरूस्त केला जात असताना ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या फॅक्‍टरीचे नाव मोहीत पेट्रोकेमिकल फॅक्‍टरी असे असून ती नगिना रोडवर आहे.

फॅक्‍टीरीचा बॉयलर गेले काही दिवस नादुरूस्त होता. त्याच्या दुरूस्तीचे काम करताना तेथे वेल्डींग केले जात होते त्यातूनच हा स्फोट झाला. फॅक्‍टरीच्या मालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पण तो मात्र अद्याप बेपत्ता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)