उत्तरप्रदेशातील गावात उल्कापात…

मुज्जफरनगर – उत्तरप्रदेशातील एका गावात काल रात्री आकाशातून दोन मोठ्या दगडासारख्या वस्तु पडल्या. त्या गरम होत्या. त्या वस्तु नेमक्‍या कोणत्या आहेत याचे गावकऱ्यांना कुतुहल आहे. तथापी हा उल्कापाताचा प्रकार असावा असे तेथील काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कसौली गावाच्या हद्दीत हे दोन दोन कठीण गोळे पडले. ते पडत असताना त्या भागात मोठा आवाजही झाला. छत्रवाल पोलिस ठाण्याच्या लोकांनी जागेवर जाऊन हे दोन्हीं गोळे ताब्यात घेतले असून ते भूगर्भ तज्ज्ञांकडे तपासायला दिले जाणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या भागातील भुगर्भाचे प्राध्यापक निरज त्यागी यांनी सांगितले की मोठ्या उल्काचे हे दोन छोटे भाग असू शकतात. या जिल्ह्यात उल्कापात होण्याचा प्रकार नवीन नाही. सन 2003 सालच्या नोव्हेंबर महिन्यात कसोैली गावातच काळ्या रंगाची एक मोठी उल्का पडली होती. असच प्रकार सन 2009 मध्येही घडला होता. त्यावेळी करीमपुर गावात दोन उल्का पडल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)