उत्तरपूर्वेत पूरपरिस्थिती गंभीर, आसामात चौघांचा मृत्यू

गुवहाती (आसाम), -गेले चार दिवस सतत पडणाऱ्या पावसाने उत्तरपूर्वेतीला पूरपरेस्थिती गंभीर बनली आहे. आसाम, त्रिपुरा,मेघालय आणि अरुणचल प्रदेशाला पुराचा मोठाच तडाखा बसला आहे. हवामान खात्याने रविवारपर्यंत धोक्‍याची सूचना दिलेली आहे. आसाममधील 19 जिल्हे पुन्हा एकदा पाण्याखाली गेल्याने जनजीवन अस्तव्यस्त झालेले आहे.

या पुराने सुमारे 10 लाख लोक पीडीत झालेले आहेत. गेल्या 24 तासात आसाममध्ये पुरामुळे मरणारांची संख्या 4 वर पोहचली आहे. 1750 खेड्यात पाणी शिरल्यामुळे 268 निवारा केंद्रांमध्ये 63 हजार लोकांनी आश्रय घेतलेला आहे. एनडीआरएफ (नॅशनल डिझॅस्टर ) चे जवान मदतकार्यात गुंतलेले असून लष्कराला सज्ज राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. .

ब्रह्मपुत्रा नदीने पुरामुळे अनेक ठिकाणी धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. दर काही तासांना पाण्याची पातळी उत्तर आसाममधील धेमाजी., लखिपुरा, तीनसुखीया, दिब्रुगड या जिल्ह्याना पुराच मोठा फटका बसलेला आहे. दर काही पुराच्या पाण्याची पातळी 5 सेंमी अशा मोठ्या वेगाने वाढत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)