उत्तरकाशी जिल्ह्यातील बलात्कार प्रकरण : उच्च न्यायालयाने नेमली एसआयटी

संग्रहित छायाचित्र

नैनीताल – उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात एका अकरा वर्षाच्या बालिकेवर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्याची सूचना उत्तराखंड हायकोर्टाने राज्य सरकारला केली असून येत्या 48 तासाच्या आत ही एसआयटी म्हणजेच विशेष तपास पथक नेमण्याचा आदेश देण्यात आला आहे.

या प्रकाराची माहिती प्रसार माध्यमांमध्ये प्रकाशित झाल्यानंतर उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत ही एसआयटी नेमण्याचा आदेश दिला आहे. सदर मुलीच्या कुटुंबालाही पुरेशी संरक्षण व्यवस्था देण्यात यावी असा आदेशही न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीचे काम जलगदगती न्यायालयाकडे सुपुर्त करण्यात यावे अशी सुचनाहीं करण्यात आली आहे.

सदर मुलगी भकडा गावातील रहिवासी होती 17 ऑगस्ट रोजी रात्री काही बांधकाम मजुरांनी तिला पळवून नेले आणि तिच्यावर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी चार मजुरांना स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात आणखी काही जणांचा सहभाग आहे काय याचाही तपास केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)