उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर

मुंबई – विधानमंडळाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण या दोन पुरस्कारांची घोषणा बुधवारी करण्यात आली. 2015 ते 2018 अशा तीन वर्षाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळालेल्या सदस्यांमध्ये विधानपरिषदेतील शिवसेनेचे डॉ. अनिल परब, भाजपचे विजय उर्फ भाई गिरकर आणि कॉंग्रेसचे संजय दत्त, तर विधानसभेतील भाजपचे डॉ. अनिल बोंडे, शिवसेनेचे सुभाष साबणे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे राहुल कुल या सदस्यांचा समावेश आहे.

2015-16 या वर्षाचा उत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड, सन 2016-17 चा राष्ट्रवादीचे राजेश टोपे, तर 2017-18 चा पुरस्कार शेतकरी कामगार पक्षाच्या धैर्यशील पाटील यांना मिळाला आहे. विधानपरिषदेत राष्ट्रवादीचे ऍड. राहुल नार्वेकर, शिक्षक आमदार कपिल पाटील आणि भाजपचे प्रवीण दरेकर हे उत्कृष्ट भाषण पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभागृह नेते चंद्रकांत पाटील, संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉं. अनंत कळसे आणि ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांच्या समितीने पुरस्कारासाठी आमदारांची निवड केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)