उत्कृष्ट पैलवानासाठी शक्‍ती व युक्‍तीची गरज – भेगडे

सोमाटणे – दरवर्षी महाराष्ट्र केसरी पैलवान हा एकच होत असतो. बाकीच्या पैलवानांनी धीर ना सोडता जोमाने कामाला लागले पाहिजे. आपणही एक वेळ महाराष्ट्र केसरी होणार, अशा सकारात्मकतेने सराव करावा. यशस्वी पैलवान होण्यासाठी शक्‍ती व युक्‍तीची आवश्‍यकता आहे, असे मत मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी व्यक्‍त केले.

सोमाटणे, मावळ येथील गुरुकुल कुस्ती संकुलाचा चौथा वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार भेगडे यांच्या हस्ते उन्हाळी कुस्ती निवासी प्रशिक्षण शिबीराचे उद्‌घाटन यावेळी करण्यात आले.

-Ads-

आंतर राष्ट्रीय पैलवान शंकर कंधारे यांच्या गुरुकुल कुस्ती संकुलातील अनेक विद्यार्थी आखाड्यांत, शालेय व राष्ट्रीय पातळीवर कुस्तीमध्ये मेडल मिळवत आहेत. विद्यार्थ्यांना कुस्तीची आवड निर्माण व्हावी व शालेय पातळीवर विविध स्पर्धेत नाव कमवावे, यासाठी यावर्षीही विद्यार्थ्यांसाठी मोफत उन्हाळी कुस्ती शिबिराचे आयोजित केले आहे.

तालमीत राहणे, खुराक, सराव करणे बिकट आर्थिक स्थितीमुळे पैलवानांना शक्‍य होत नाही, म्हणून गुरुकुल कुस्ती संकुलातून 12 पहिलवान दत्तक घेणार आहेत, असे आमदार भेगडे यांनी सांगितले. महाराष्ट्र केसरी झाल्यावर ऑलिम्पिकमध्ये पैलवान जात नाही, ही खंत देखील त्यांनी व्यक्‍त केली. आज-काल बहुतांश तरुण-तरुणी मैदानी खेळ विसरत चललेत. गुरुकुल कुस्ती संकुल उत्कृष्ट पहिलवान घडवत आहेत. त्यांचे हे कार्य उल्लेखनीय आहे, असे मत भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले यांनी व्यक्‍त केले. विशाल खंडेलवाल, लहुमामा शेलार, बाळासाहेब घोटकुले, नितीन घोटकुले, बाळा भेगडे, राजू मिरघे, बाळासाहेब सातकर, बाळासाहेब काळोखे, संभाजी राक्षे यावेळी उपस्थित होते.

आंतर राष्ट्रीय खेळाडू शंकर कंधारे, खंडू वाळूंज, मुरली गराडे, गुलाब जाधव, रोहिदास बोरगे यांनी संयोजन केले. भाऊसाहेब कोकाटे यांनी सूत्रसंचालन व नितीन पोटे यांनी आभार मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)