उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलिसांचा विशेष सन्मान

पाचगणी : उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिसांचा सन्मान करताना विश्‍वास नांगरे-पाटील व इतर.

पाचगणी, दि. 18 (प्रतिनिधी) – पाचगणी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी सीसीटिव्ही फुटेज अंतर्गत गुन्हे उकल करून आरोपीस जेरबंद करण्याची उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वैभव भिलारे, अभिजित घनवट, शिवाजी पांबरे या पोलिसांचा कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे.
वाई येथे उपविभागागिय पोलीस कार्यालया अंतर्गत पोलीस ठाण्याच्या झालेल्या विशेष कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला. यावेळी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, आधी उपस्थित होते.
पाचगणी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असताना गोपनीय विभागाची जबाबदारी सांभाळीत सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळण्याचे यशस्वी काम करून पाचगणी पोलीस ठाण्याचे नाव उंचविण्याचे काम केले आहे. अशा कर्तृत्ववान पोलीस कर्मचाऱ्यांचे यावेळी नांगरे पाटील यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी वाई उपविभागीय पोलीस कार्यालयांतर्गत येणाऱ्या महाबळेश्वर, पाचगणी, वाई, भुईंज व मेढा या पोलीस ठाण्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अशाच कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याचा गौरव या निमित्ताने कोल्हापूर परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते झाला आहे. या कार्यक्रमास वाई पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे, महाबळेश्वर सपोनि महेंद्र निंबाळकर, पाचगणी सहा. पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे, भुईंजचे सपोनि बाळासाहेब भरणे, मेढा सपोनि जीवन माने सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)