उत्कर्ष क्रीडा मंडळ संघाला कुमार मुलांच्या गटांत अजिंक्‍यपद 

file photo

कुमार गट मुले व मुली जिल्हा अजिंक्‍यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा 
पुणे – चुरशीच्या अंतिम सामन्यात भैरवनाथ संघावर पिछाडीवरून झुंजार मात करताना उत्कर्ष क्रीडा मंडळ संघाने कुमार गट मुले व मुली जिल्हा अजिंक्‍यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतील कुमार गट मुलांच्या विभागात विजेतेपद पटकावले. पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन व काळभैरवनाथ विकास प्रतिष्ठान यांनी संयुक्‍तपणे या स्पर्धेचे आयोजन केले होते. खराडी येथील कै. राजाराम भिकू पठारे प्राथमिक विद्यालयाच्या कै. वि. मा. पठारे इनडोअर स्टेडियममध्ये ही स्पर्धा पार पडली.

कुमार गट मुलांच्या अंतिम सामन्यात उत्कर्ष क्रीडा मंडळ संघाने 27-20 गुणांनी भैरवनाथ संघावर 7 गुणांनी विजय मिळविताना तिसऱ्यांदा विजेतेपद पटकाविले. अभिजित चौधरी व अमित मिसाळ यांने केलेल्या उत्कृष्ट केलेल्या चढाया व चेतन पारधे व तुषार आधवडे यांनी केलेल्या उत्कृष्ट पकडी यामुळे उत्कर्ष क्रीडा संघाने हा सामना जिंकला. मध्यंतराला उत्कर्ष क्रीडा मंडळ 8-9 असा पिछाडीवर होता. मात्र अभिजित चौधरी व अमित मिसाळ यांच्या चढाया व चेतन पारधे व तुषार आधवडे यांच्या पकडींमुळे त्यांनी सामन्याचे पारडे फिरविले.

शेवटच्या पाच मिनिटामध्ये दोन वेळा सुपर टॅकल घेत उत्कर्ष संघाने आपली आघाडी वाढवली व विजेतेपदाला गवसणी घातली. भैरवनाथ संघाच्या संकेत लांडगे व अक्षय वढाणे. यांने चांगल्या चढाया केल्या तर योगेस अक्षुममी व हर्षल माने याने उत्कृष्ट पकडी घेतल्या. संपूर्ण सामन्यात भैरवनाथचा चढाईपटू संकेत लांडगेने जोरदार झुंज दिली. परंतु शेवटची तीन मिनिटे बाकी असताना त्याची तिघाजणांमध्ये पकड झाली आणि भैरवनाथ संघाच्या हातून सामना सुटला.

त्याआधी कुमार गट मुलांच्या उपात्य सामन्यात उत्कर्ष क्रीडा संस्था संघाने महाराणा प्रताप संघ मंचर या संघावर 39-19 असा दणदणीत विजय मिळवीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मध्यंतराला उत्कर्ष क्रीडा संस्थेकडे 18-6 अशी आघाडी होती. तसेच मुलांच्या दुसऱ्या उपान्त्य सामन्यात भोसरीच्या भैरवनाथ संघाने पुण्याच्या नूमवि संघावर 44-19 गुणांनी विजय मिळवित अंतिम फेरी गाठली होती. मध्यंतराला भैरवनाथ संघाकडे 29-7 अशी आघाडी होती.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे, स्पर्धा मुख्य संयोजक माजी आमदार बापू पठारे, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष बाबूराव चांदेरे, पंढरीनाथ पठारे, नगरसेवक महेंद्र पठारे, भय्यासाहेब जाधव, संजीला पठारे, सुमन पठारे, महादेव पठारे, वडगाव शेरी मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष नारायण गलांडे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्षा वासंती बोर्डे, उपकार्याध्यक्ष राजेंद्र देशमुख, उपाध्यक्ष शकुंतला खटावकर, सरकार्यवाह मधुकर नलावडे, सहकार्यवाह बलराज वाडेकर, राजेंद्र आंदेकर, योगेश यादव, शिल्पा भंडारी, स्पर्धा पंच प्रमुख आंतरराष्ट्रीय पंच दत्ता झिंजुर्डे, स्पर्धा निरीक्षक नीलेश लोखंडे, भाऊसाहेब करपे,रविंद्र वाळके आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)