उड्डाणपूलासाठी तरतूद करण्याची मागणी

पुणे – सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी राजाराम पूल ते फन टाईम थिएटरपर्यंत उड्डाणपूल उभारण्यासाठी आगामी 2019-20 या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये 50 कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी नगरसेवक श्रीकांत जगताप यांनी महापालिका आयुक्‍तांकडे केली आहे.

सिंहगड रस्त्याच्या दुतर्फा मोठ्याप्रमाणावर नागरीकरण झालेले आहे. अशा परिस्थितीत खडकवासलाकडे जाण्यासाठी सिंहगड रस्ता हा एकच मार्ग असल्याने या रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी होते. त्यातही राजाराम पूल ते फन टाईम थिएटरच्या परिसरात सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत नागरिकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. राजाराम पूल ते फन टाईम थिएटरपर्यंत उड्डाणपूल बांधण्यासाठी महापालिकेने आराखडाही तयार केला आहे. यासाठी सुमारे 80 कोटी रुपये खर्च आहे. चालू वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये स्थायी समितीने दहा कोटी रुपयांची तरतूद केली होती; परंतु कुठलाही प्रकल्प सुरू करण्यासाठी किमान प्रकल्पाच्या खर्चाच्या पन्नास टक्‍के आर्थिक तरतूद असणे गरजेचे असल्याने यावर्षी उड्डाणपूल उभारणे शक्‍य झाले नाही. सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा विचार करता आगामी अंदाजपत्रकामध्ये आयुक्‍तांच्या अंदाजपत्रकात 50 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करावी आणि उड्डाणपुलाचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)