उड्डाणपुलाला संत तुकाराम महाराजांचे नाव देण्याची मागणी

पिंपरी – महापालिकेच्या वतीने दापोडीत उभारलेल्या उड्डाणपूलाला संत तुकाराम महाराज यांचे नाव द्यावे, अशी मागणी समाजवादी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. शहराध्यक्ष रफिक कुरेशी यांनी या मागणीचे निवेदन महापौर राहुल जाधव यांना दिले आहे. महापालिकेच्या वतीने दापोडी व पुणे-मुंबई महामार्गाला जोडणारा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या ठिकाणाहून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे मार्गक्रमण होत असते. लाखो भाविकांचा या पालखी सोहळ्यात सहभाग असतो. महापालिकेच्या वतीने दापोडीत उभारलेल्या उड्डाणपुलाला संत तुकाराम महाराजांचे नाव दिल्यास, ते सार्थकी लगणार आहे. जनभावना लक्षात घेवून, या पुलाला संत तुकाराम महाराजांचे नाव द्यावे, अशी मागणी केली आहे. या शिष्टमंडळात शहर महासचिव मोहसीन भाई शाह, उपाध्यक्ष सालीम सय्यद, संघटक विनोदकुमार यादव, सुरेश शर्मा गफुर खान, आरीफ खान आदी कार्यकर्ते उपस्थित होते

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)