उड्डाणपुलांवर जाहिरात करणाऱ्यांवर गुन्हा

पिंपरी – उड्डाणपूल व महापालिका मालकीच्या मिळकतींवर अनधिकृतपणे स्टिकर्स, बॅनर चिटकवून या मिळकती विद्रुप करणाऱ्या व्यक्ति व संस्थांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. शहरातील गर्दीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये, याकरिता महापालिकेच्या वतीने उड्डाणपुल उभारले आहेत. मात्र, या उड्डाणपुलांच्या खांबांवर अनेक व्यक्ति व संस्थांकडून आपल्या संस्थेची स्टिकर्स, बॅनर्सच्या माध्यमातून अनधिकृतपणे जाहिरात केली जात आहे. यामुळे शहरातील सर्व उड्डाणपुलांचे सौंदर्यात बाधा येत असून, शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत आहे.

-Ads-

स्मार्ट सिटीतील उड्डाणपूल फुकट्या जाहिरातींच्या विळख्यात सापडले आहेत. उड्डाणपूल आणि महापालिका मालकीच्या मिळकतींवर अनधिकृत केलेल्या जाहिरातबाजीचा अहवाल येत्या आठ दिवसांत स्थायी समितीला सादर करावा. तसेच या उड्डाणपुलांच्या सौंदर्यात बाधा निर्माण करणाऱ्या व्यक्ती व संस्थांवर गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)