उडी मारुन रुग्णाची आत्महत्या

पिंपरी – महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून एका रुग्णाने आत्महत्या केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 6) सकाळी सातच्या सुमारास घडली.

शंकर पात्रे (वय-45) असे आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव आहे. पात्रे यांना दारूचे व्यसन होते. त्यावरील उपचारासाठी त्यांना शुक्रवारी (दि. 3) वायसीएम रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात भरती असताना ते वारंवार रुग्णालयाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांच्यावर तिसऱ्या मजल्यावर उपचार सुरु होते. आज सकाळी ते आपत्कालीन जिन्यातून दुसऱ्या मजल्यावर आले. तिथून त्यांनी खाली उडी मारली. यामध्ये पात्रे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

-Ads-

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)