उडीदाचे भाव पडल्याने तामिळनाडूतील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

चेन्नई : उडीदाचे भाव सतत पडत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात चिंतेत आहेत. त्यांनी उत्पादित केलेला शेतमाल त्यांना स्वस्तात विकावा लागत असल्याने यात आणखी भर पडली आहे.

डाळींची खरेदी करण्याची घोषणा जरी तामिळनाडू सरकारने केली असली, तरी किमान आधारभूत किंमतीनुसार शासनाकडून खरेदी सुरू होईपर्यंत त्याचा साठा करावा की खुल्या बाजारात त्याची विक्री करावी, या संभ्रमात शेतकरी सापडले आहेत. उडीदाला १०,००० रु./क्विंटलचा हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

-Ads-

दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी उडीदाचे एक पोते १२,०००-१५,००० रु. याप्रमाणे विकले होते. पण, मागील दोन वर्षांपासून उडीदाला जास्तीतजास्त ३,५००-४,५०० रु. भाव मिळत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)