‘उडान’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

वडगाव मावळ – आंबी (ता.मावळ) येथील डॉ. डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी उडान हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या व्यस्त वेळापत्रकातील तणाव मोकळा करण्याची संधी मिळावी आणि सोबतच उद्योग जगताबाबत ज्ञानवर्धन ही व्हावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना यशस्वी उद्योजकांचे विचार ऐकायला मिळावे ह्यासाठी दरवर्षी ह्या कार्यक्रमाची आयोजन केले जाते. यंदा प्रमुख पाहुणे म्हणून मानस ऑटोमोटिव्ह सिस्टिम लिमिटेडचे एम डी राजेश म्हस्के यांनी विद्याथ्यांना शिक्षण घेत असताना भविष्यात नोकरीसाठी लागणारे गुण कसे आत्मसात करावे तसेच यशस्वी उद्योजक होण्यासाठीचे लागणारे कौशल्य कसे जोपासावे याबाबत मार्गदर्शन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अभय पवार यांनी विद्याथ्यांनी परिक्षेची तयारी कोणताही ताण न घेतां कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील व संचालक डॉ रमेश वस्सपनवरा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडला. कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी भवनराव गायकवाड , रजिस्टार अशोक पाटील, उपप्राचार्य डॉ प्रकाश पाटील तसेच सर्व विभागप्रमुख डॉ शैलेश चन्नापटन्ना, डॉ मिनिनाथ निघोट, संजय बडे, विकास मपारी उपस्थित होते. सूत्रसंचालन मिलिंद करंजकर यांनी केले तर प्रथम वर्ष विभागप्रमुख विठ्ठल वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)