उडदाचे शक्‍तीवर्धक लाडू असे करावेत…

सालम, सफेद मुसळी, शतावरी, गोखरू, तालिमखाना प्रत्येकी पस्तीस ग्रॅम, तमालपत्र, वेलची, मिरे, पिंपळीमूळ, लेंडीपिंपळ प्रत्येकी पंचवीस ग्रॅम, जायफळ, जायपत्री, लवंग, मिरे, प्रत्येकी सहा ग्रॅम, बदाम व पिस्ते सव्वाशे ग्रॅम प्रत्येकी, उडदाचे पीठ एक किलो, पिठी साखर दोन किलो, साजूक तूप दीड किलो, असे साहित्य घ्यावे. उडदाचे पीठ चांगले तूपात भाजावे.वरील साहित्य घालून लाडू बांधावेत. हे लाडू शक्तिसाठी उत्तम आहेत. दररोज सकाळी एक लाडू खाऊन वर थोडे गाईचे दूध प्यावे.

तोंडाला चव येण्यासाठी आजारपणात किंवा तोंड आले असता उष्णतेच्या विकारात – उडीद डाळ शिजवून ती गाईच्या तूपावर जिर,मोहरी, आमसूल, लसूण,हिंग,किंचित्‌ लाल तिखट घालून फोडणीचे वरण करावे. वरून सैंधव मीठ व कोथिंबिर घालावी. असे वरण हातसडीच्या भाताबरोबर खावे. तोंडाला रूची उत्पन्न होते. अशाप्रकारे उडीद हे शक्‍तीवर्धक,धातूवर्धक कडधान्य आयुर्वेदाने मान्य केलेले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)