उठसूठ कोणालाही आमदार म्हणू नका : अजित पवार

जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक

पुणे – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षातील कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद विसरून कामाला लागा, असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. तसेच कोणालाही आमदार म्हणत बसू नका, “या आमदार, बसा आमदार’ असे म्हटल्यामुळे त्याच्याही डोक्‍यात हवा जाते आणि त्याला आपण आमदार झाल्यासारखे वाटत. मात्र, त्यांमुळे खरा कार्यकर्ता बाजूला पडत आहे. पक्षासाठी प्रत्येक कार्यकर्ता हा महत्वाचे आहे, असे पवार यांनी सांगितले.

-Ads-

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक जिल्हा बॅंकेमध्ये पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. याप्रसंगी पवार यांनी नेहमीच्या “स्टाईल’ने कोपरखळ्या मारत कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. ते म्हणाले, “जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात आणि जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍याचा दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्यातील मतभेद मिटवावेत.तसेच विविध पदे भूषविली आहेत त्यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत.’

पुरंदर तालुुक्‍यात पिछेहाट?
जिल्ह्यातील कोणत्या तालुक्‍यातून किती कार्यकर्ते आले आहेत, हे पाहण्यासाठी पवार यांनी कार्यकर्त्यांना हात वर करायला लावले. त्या वेळी सर्व तालुक्‍यांमधून समाधानकारक उपस्थिती होती. मात्र, पुरंदर तालुक्‍यातील कार्यकर्त्यांना हात वर करायला सांगितल्यानंतर केवळ दोघांनीच हात वर केले. यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते आणि माजी आमदार अशोक टेकवडे यांचा समावेश होता. यावर हे दोघे उपस्थित राहिल्यामुळे पक्षाचे प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते निघून गेल्याची चर्चा रंगली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
22 :thumbsup:
21 :heart:
2 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)