उज्वला गॅस योजना महिलांसाठी वरदान : ओंबासे

म्हसवड – ग्राहकांना विनम्र सेवा देण्याबरोबर विविध सामाजिक कार्यात शुभम भारत गॅस एजन्सी अग्रेसर असल्याचे प्रतिपादन कराड अर्बन बॅंकेच्या म्हसवड शाखेचे व्यवस्थापक विलास ओंबासे यांनी व्यक्त केले. दरम्यान, केंद्र शासनाची उज्वला गॅस योजना महिलांसाठी वरदान ठरली असल्याचेही त्यांनी सांगितले.

म्हसवड, ता. माण येथील शुभम भारत गॅस एजन्सी मार्फत प्रधान मंत्री एलपीजी पंचायत दिनाचे औचित्य साधून उज्वला गॅसचे मोफत वितरण विलास ओंबासे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. सूर्यकांत फुटाणे, सुनील पोरे, सौ. सुवर्णाताई पोरे, आप्पा पोरे, करण पोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

-Ads-

समाजसेवेचा वसा घेऊन, दुष्काळी माण तालुक्‍याचा आधारवड म्हणून काम करणाऱ्या शुभम भारत गॅस एजन्सीने प्रधान मंत्री एलपीजी पंचायत दिनाचे औचित्य साधून उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घराघरात पोहचवण्याचे काम करून दुष्काळी माण तालुक्‍यात आदर्श निर्माण केला आहे, असे उद्‌गारही ओंबासे यांनी काढले.

यावेळी ओंबासे म्हणाले, दुष्काळी माण तालुक्‍यात समाजसेवेचा वसा घेऊन आधारवड बनलेल्या शुभम भारत गॅस एजन्सीने प्रधान मंत्री एलपीजी पंचायत दिनाचे औचित्य साधून मोफत गॅसचा लाभ घराघरात देऊन, रेकॉर्डब्रेक काम केले आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. महिलांना चुलीच्या धुरामुळे होणारे विविध आजाराचा त्रास कमी होऊन महिलांचे आरोग्य सुधारणार आहे. महिलांनी गॅसचे प्रशिक्षण घेऊन वापर करावा, असे आवाहन करून केंद्र शासनाची उज्वला गॅस योजना महिला वर्गासाठी वरदान ठरली आहे.

यावेळी सुवर्णाताई पोरे म्हणाल्या केंद्र शासनाच्या उज्वला गॅस योजनेचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा यासाठी शुभम गॅस एजन्सी प्रयत्न करत असून सुमारे साडेचार हजार गॅस कनेक्‍शन चा लाभ मिळवून देऊन इतर एजन्सीच्या तुलनेत रेकॉर्ड केले असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात सुनिल पोरे यांनी उज्वला गॅस योजनेचा लाभ सर्वसामान्य 240 महिलांना दिला असून मोफत वितरण करण्यात आले आहे. यावेळी करण पोरे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)