उज्ज्वला योजनेतून मिळणार 5 किलोचाही सिलिंडर

100 रुपयांत जोडणी : पहिल्या सिलिंडर पुनर्भरणासाठी मिळणार कर्ज

पुणे – पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दारिद्य्र रेषेखालील (बीपीएल) 1 लाख 27 हजार 399 महिलांना गॅस जोडणी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे केवळ शंभर रुपये भरून महिलांना ही गॅस जोडणी देण्यात आली आहे. दरम्यान, ज्या महिलांना 14 किलोचा गॅस सिलिंडर परवडत नसेल, त्यांच्यासाठी 5 किलोचा सिलिंडरही उपलब्ध करुन दिला जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत मार्च 2019 पर्यंत बीपीएल कुटुंबांतील महिला सदस्यांना 5 कोटी एलपीजी कनेक्‍शन, आणि मार्च2020 पर्यंत अतिरिक्त 3 कोटी एलपीजी कनेक्‍शन देण्यासाठी 12 हजार 800 कोटी एवढ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, ऑगस्ट 2018 मध्येच गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी 5 कोटींचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती योजनेच्या पुणे जिल्हा नोडल अधिकारी अनघा गद्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गद्रे म्हणाल्या, “गॅसजोड मिळालेल्या महिलांना सिलिंडर खरेदीसाठी आगाऊ पैसे देऊ न शकणाऱ्या महिलांना सिलिंडर संपल्यानंतर पहिल्यावेळेस सिलिंडर पुनर्भरणासाठी घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. या कर्जाची वसुली सातव्या सिलिंडरपासून सुरू होणार आहे. तसेच जिल्ह्यात योजनेअंतर्गत मिळालेल्या गॅसचे पुनर्भरण करण्याचे प्रमाण 76 टक्के एवढे आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्‍यात 9 हजार 905, पुरंदर-7 हजार 802 , दौंड-11 हजार, इंदापूर-15 हजार 800, जुन्नर-14 हजार, तर वेल्हे तालुक्‍यात 1 हजार 477 गॅस जोडणी देण्यात आली आहे.’

धुराचे प्रमाण कमी
सामाजिक संस्थच्या सर्वेक्षणानुसार चुलीवर एक तास स्वयंपाक करतेवेळी 400 सिगारेट एवढा धूर महिल्यांच्या शरीरात जातो. याचा त्रास महिलांना जाणवतो. प्रामुख्याने चाळीशीनंतर याचा त्रास सुरू होतो. त्यामुळे पारंपारिक इंधन म्हणून लाकडाचा वापर न करता स्वयंपाकांचे इंधन म्हणून एलपीजीचा वापर करण्यास प्राधान्य दिले आहे. यामुळे स्वयंपाकघरातील प्रदूषण नाहीसे झाले आहे, अशी माहिती गद्रे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)