उज्ज्वला योजनेतून महिलांचा सन्मान 

कैलास माळी : धामोरी येथे उज्ज्वला दिन कार्यक्रमास प्रतिसाद
कोपरगाव – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील दारिद्रयरेशेखालील महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान करण्यासाठी विना अनामत उज्ज्वला गॅस योजना प्रत्यक्षात आणली. त्याचे अनुसुचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना आदिवासी बांधवांना गॅसचे वितरण करून उज्ज्वला दिवस साजरा केल्याचे प्रतिपादन संजीवनी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कैलास माळी यांनी केले.
कोपरगाव मतदारसंघात आमदार स्नेहलता कोल्हे या उज्ज्वला गॅस योजनेबाबत सातत्याने माहिती देवून याबाबतच्या प्रचारप्रसाराचे काम करीत असल्याचेही ते म्हणाले. कोपरगाव गॅस कंपनीचे संचालक अविनाश सातपुते यांनी 20 एप्रिल संपूर्ण देशात उज्ज्वला दिवस म्हणून साजरा केला जात आहे. ग्रामीण भागात धामोरी येथे याची आठवण म्हणून दारिद्रयरेशेखालील लाभार्थ्यांना गॅसचे वितरण होत आहे. हा आनंदाचा क्षण आहे.
व्यवस्थापक लक्ष्मण निसमे सांनी गॅस सुरक्षितता व त्याचा वापर याबाबत माहिती दिली. याप्रसंगी माजी उपसभापती वैशाली साळुंके, मायगावदेवीचे सरपंच बिजलाबाई साबळे, मोहन माळी, वसंतदादा माळी, बाजीराव मांजरे, मोर्वीस, चासनळी, मंजूर, मायगाव देवी येथील महिला लाभार्थी उपस्थित होत्या. डॉ. वाणी यांनी प्रास्तविकात उज्ज्वला दिनाची माहिती दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कोपरगाव गॅस कंपनीचे सर्वश्री श्‍याम गोसावी, सिद्धार्थ भुसारे, शिवाजी घुले आदींनी विषेश परिश्रम घेतले. अविनाश सातपुते यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)