पिंपरी – केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उज्ज्वला गॅस योजनेचा कारभार संशयास्पद असून याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भीमसंग्राम संघटनेच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.
संघटनेने म्हटले आहे की, दारिद्रय रेषेखालील व पिवळे रेशनकार्डधारकांना पंतप्रधान योजनेअंतर्गत गॅस योजनेचा लाभ दिला जात आहे. याद्वारे एक सिलेंडर शेगडी मोफत दिली जाते. या योजनेचा लाभधारक मागासवर्गीय वर्ग हा झोपटपट्टी भागात राहणार आहे. त्याच्या अज्ञानाचा गैरफायदा गॅस एजन्सी धारक घेत असून सधनांना त्याचा लाभ करुन दिला जात आहे. ते नागरिकांकडून पैसे उकळतात असताना मोफत वाटप केल्याचे भासवले जात आहे.
नागरिकांकडे मनमानी पध्दतीने पैशांची मागणी केली जात आहे. कोणत्याही गॅस एजन्सीला पैसे देऊ नयेत, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले. या योजनेत पारदर्शकपणा आणावा. लाभार्थींची चौकशी करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष राहुल वडमारे यांनी दिला आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा