“उज्ज्वला’अंतर्गत अवसरीत गॅस वाटप

मंचर- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत 103 महिलांना गॅस जोडणी आणि 14 व्या वित्त आयोगातून गावातील अंगणवाड्यांसाठी खेळणी साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ग्रामंपचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखानाचे संचालक शांताराम बापू हिंगे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी सेलचे अध्यक्ष गौतमराव रोकडे, माजी जिल्हा परिषद सदस्यां रेवती वाडेकर, सरपंच पवन हिले, उपसरपंच सचिन हिंगे, माजी सरपंच संगीता फल्ले, माजी उपसरपंच अशोकराव हिंगे, किशोर हिंगे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत वाडेकर, माया टाव्हरे, शितल हिंगे, वसुधा वाघमारे, स्वप्नील हिंगे, जी. सरकार, मनीषा फल्ले, कांताराम हिंगे, अवसरी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष मनोज हिंगे, युवती अध्यक्षा मनिषा हिंगे, संभाजी हिंगे, प्रशांत हिंगे, गणेश चव्हाण, अजय चव्हाण, महेंद्र शिंदे, संदीप हिंगे आणि गावातील लाभधारक महिला, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. अजून दोन याद्यांमध्ये नवीन लाभार्थींची नावे येणार आहेत, असे यावेळी उपसरपंच सचिन हिंगे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)