उजनी धरण 98 टक्के भरले

बिजवडी- पावसाचे प्रमाण कमी-अधिक असल्याने विसर्ग कमी करण्यात आला असला तरी गेल्या दोन दिवसांत बंडगार्डन येथून 38 हजार तर दौंड येथून 54 हजार क्‍युसेक पाणी उजनी धरणात मिसळत होते. त्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी 98.69 टक्केपर्यंत गेली आहे. मंगळवार (दि.21) सायंकाळी उजनी 66 टक्के भरले होते. त्यानंतरही पुढील तीन दिवस विसर्ग कमी होत गेला तरी धरण पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

खडकवासला आणि भीमाखोऱ्यातील धरण क्षेत्रात पाऊस वाढला तर पुन्हा विसर्ग वाढविला जावू शकतो. यामुळे उजनी धरणातून भीमा नदीत कधीही पाणी सोडले जाऊ शकते. यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा उजनी धरण व्यवस्थापनाने दिला आहे. आजपर्यंत खडकवासलातून 18 हजार 491 क्‍युसेक, चासकमान 9 हजार 125, मुळशी 10 हजार 160, वडजगाव 6 हजार, पानशेत 5 हजार 478, डिंभे 5 हजार 470, पवना धरणातून 4 हजार 326 क्‍युसेक असा एकूण 67 हजार 858 क्‍युसेक विसर्ग झाला आहे. याशिवाय नीरा खोऱ्यातील गुंजवणी धरणातून 3 हजार क्‍युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे. या विसर्गामुळे दौंडच्या विसर्गात वाढ होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)