उजनी धरणाजवळ खासगी मिनी ट्रॅव्हल्स उलटली

एकूण अठरा जण जखमी ः चार जण गंभीर
– तीर्थयात्रेसाठी जाताना झाला हिंगणगाव येथे अपघात

इंदापूर – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उजनी धरणा लगत हिंगणगावच्या पुलावर तीर्थयात्रेसाठी निघालेली खासगी मिनी ट्रॅव्हल उलटून अपघात झाला. या अपघातात 18 यात्रेकरू जखमी झाले असून चार जणांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात आज रविवारी (दि. 16) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स अलिबागहून तीर्थयात्रेसाठी पंढरपूरकडे निघाली होती. अपघातातील सर्व जखमी यात्रेकरू हे एकमेकांचे अगदी जवळचे नातेवाईक आहेत. जखमींतील चार जणांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अकलूज (जि. सोलापूर) येथे हलविण्यात आले आहे.

सविस्तर माहिती अशी की, अलिबाग येथील पाटील कुटुंबीय तीर्थयात्रेसाठी खासगी कंपनीच्या ट्रॅव्हल्सने (एमएच 04 जी 4633) पंढरपूरकडे निघाले होते. रविवारी (दि. 16) सायंकाळी ही ट्रॅव्हल इंदापूर तालुक्‍यातील हिंगणगाव पुलाजवळ आली असताना चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने गाडीने दोन चार उलटून रस्ताच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडली. गाडी उलटली त्या ठिकाणी अगदी दोन फुट अंतरावर वीस फुट खोल खड्डा होता. सुदैवाने गाडी थांबल्याने मोठा अनर्थ टळला. गाडीमध्ये असणाऱ्या खाद्य पदार्थ व स्वयंपाकाचा भाजीपाला अस्ताव्यस्त पडल्याने घटनेचे गांभीर्य दिसून येत होते. गाडीतच स्वयंपाकाचा सिलिंडर होता. गाडी उलटल्याने सिलिंडर बाजूला पडला होता. जर सिलिंडरचा स्फोट झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. जखमींना इंदापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले आहे.

जखमींची नावे पुढीलप्रमाणे –
गौरी गिरीश पाटील (वय 28), सुनिता सुधाकर पाटील (52), मैथिली मोहन पाटील (16), योगिता शिरीश पाटील (36), प्रकाश बळीराम कीणी (40), रामकृष्ण बाळ भाटकर (38), मंदार भास्कर पाटील (28), सुषमा महेंद्र पाटील (40), प्रदीप कीणी (45), महेंद्र प्रभाकर पाटील (46), सुधाकर पाटील, प्रणिता कीणी (17), अथर्व महेंद्र पाटील (10), प्रचिती प्रकाश कीणी (15), अर्चना प्रकाश कीणी (35), काका पाटील, वृषभ बाळकृष्ण भाटकर (37), अल्पेश भास्कर पाटील (27, सर्व रा. अलिबाग, जि. रायगड)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)