उजनी जलाशयातून अवैध मासेमारी

दोन लाखांचे लहान मासे जप्त : जलसंपदा विभाग व भिगवण पोलिसांची कारवाई

भिगवण- कुंभारगाव (ता. इंदापूर) येथील उजनी जलाशयात अनधिकृतपणे लहान माशांची शिकार करून बिहारमध्ये विक्री करण्यासाठी निघालेल्या परप्रांतीय नागरिकाला जलसंपदा विभागाने भिगवण पोलिसांच्या मदतीने पकडले आहे. त्यांच्याकडून दोन लाख रुपये किंमतीचे दहा पोती लहान मासे ताब्यात घेतली आहेत.
ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव मेघनाथ दिलचंद सहानी (रा. खानपिपरा, ता. फिनहरा जि. मोतीहरी, बिहार) आहे. या प्रकरणी पाटबंधारे विभागाचे संजय मेटे यांच्या फिर्यादी नुसार सहानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कुंभारगावचे बीटधारक सोनल गणपत माने यांना कुंभारगाव येथील पानसरेवस्ती नजीक उजनी जलाशयातून मेघनाथ दिलचंद सहानी यांनी अनधिकृतपणे लहान मासे काढले असल्याची माहिती मिळाली होती. तसेच तो दहा पोत्यात मासे भरून विक्रीसाठी बिहारकडे निघाला होता. त्यामुळे मेटे भिगवणमध्ये आले असता त्यांना पुणे-सोलापूर महामार्गालगत एक इसम बारदाण्याची 10 पोती त्यात वाळलेले लहान मासांची पोती रस्त्याच्या कडेला ठेवून वाहनाची वाट पाहत असताना आढळून आले. चौकशी केली असता कुंभारगाव येथून उजनी जलाशयातून मासांची शिकार करून त्याची विक्री करण्यासाठी बिहारला घेऊन चालल्याचे समजले. शासनाने उजनी जलाशयाच्या पाण्यातून लहान मासे मारण्यावर बंदी घातली आहे. तरीही जलाशयातून मोठ्या प्रमाणात मासांची शिकार करण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)