उजनीलगतची चारा पिके लोळवली

पळसदेव- इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागाला रविवारी (दि.27) रात्री जोरदार वादळी वाऱ्याचा फटका बसला. उजनी धरणालगत शेतकऱ्यांची चारा पिके पावसामुळे लोळली आहेत तर अनेक ठिकाणी वीजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा रात्रीपासून गायब झाला आहे.
कळस, पळसदेव, लोणी-देवकर, रुई, न्हावी, लाकडी, अकोले, डाळज भागात रविवारी रात्री आठ वाजल्यानंतर सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची मका, कडवळसारखी चारा पिके जमीनदोस्त झाली आहेत. शिवाय शेतातील आंबा पिकालाही याचा मोठा फटका बसला आहे. या वादळी वाऱ्यामुळे इंदापूर उपविभागातील उच्च वाहिनीचे पाच तर इतर वाहिनीचे 22 खांब पडले आहेत. यामुळे पळसदेव भागातील वीज गायब झाली होती. दरम्यान, वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचे उपविभागीय अभियंता आर.एम. गोफणे यांनी सांगितले. तर पळसदेव येथील खडकवासला पाटबंधारे विभागाच्या पर्जन्यमापक यंत्रावर या पावसाची नोंद तीन मिलि मिटर एवढी झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)