“उजनी’च्या पाण्याला तोंड लावता येत नाही

  • मच्छिमारांनी मांडल्या व्यथा : “नमामी चंद्रभागा’ यात्रेदरम्यान जलाशयातील प्रदुषणाची पाहणी

भिगवण – उजनीच्या या विशाल जलाशयात मासेमारीला जाताना जलाशयाच्या पाण्याला तोंड लावता येत नाही. पाण्यात सतत पाय राहिले तर त्वचारोग होतात, माशांच्या प्रजाती कमी झाल्या असे त्यांनी सागितले. प्रदुषित पाण्यामुळे शेती, माणसे, जनावरांवर होणाऱ्या वंध्यत्व सारख्या, जनावरांच्या दूध व वेतावर होत असलेची व्यथा भिगवण येथे मच्छिमारांनी मांडली.
भीमाशंकर ते पंढरपूर -बीजापूर दरम्यान आयोजित “नमामी चंद्रभागा’ जलसाक्षरता यात्रेचे आज (शनिवारी) भिगवण येथे आगमन झाले. त्यावेळी भिगवण येथे उजनी जलाशय प्रदुषणाची पाहणी करण्यात आली. त्यावेळी मच्छिमारांनी आपल्या व्यथा मांडल्या. जलाबिरादरीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रसिंह यांच्या प्रेरणेतून आणि अर्थ, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “नमामी चंद्रभागा’ या जलसाक्षरता यात्रेतील यात्रेकरू, विद्यार्थी, पत्रकार, कार्यकर्ते यांनी उजनीची पाहणी केली. पाण्यातील विरघळलेल्या ऑक्‍सीजनचे प्रमाण तपासण्यात आले.
महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष अनिल पाटील म्हणाले की, शहर आणि उद्योगांनी उजनी धरण हा सेप्टीक टॅंक केला असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर ओंकारनाथ मंदिर (रांझणी) येथे जल कलश पूजन करण्यात आली. अकोले येथे लोकसंवाद कार्यक्रमात वनक्षेत्रपाल राजेंद्र कुलकर्णी यांनी वित्त-वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे वनविभाग लोकाभिमुख झाल्याचे सांगितले आणि वन विभाग प्रयत्नांची माहिती दिली. यावेळी जलबिरादरी संघटक सुनील जोशी, यात्रा समन्वयक नरेंद्र चुघ, अनिल पाटील, वन विभागाचे राजेंद्र कुलकर्णि , पूजा डोडीया, योगेश पवार, राजाभाऊ पाटील, भारत माने, हांडे, अनिल कानडे, ऍड. जगताप, तोडकर उपस्थित होते.
दरम्यान, भिगवण येथील उजनी जलाशया जवळ उपस्थितांनी जलप्रतिज्ञा घेतली. तसेच भीमा नदी कार्य दलाची स्थापना करण्यात आली. तर “जल है तो कल है ‘ हे पथनाट्य सादर करण्यात आले. नरेंद्र चुघ यांनी राजेंद्रसिंह , जलबिरादरी यांच्या जलरक्षा प्रयत्नांची माहिती दिली. ते म्हणाले नदीतून अमृत वाहिले पाहिजे. नदीचे गटार करणे हा अक्षम्य अपराध आहे. शहरांनी जागृत होऊन सांडपाण्यांवर प्रक्रिया केली पाहिजे.

पर्यावरण दृष्ट्या भिगवण तलावाचे महत्व अनन्यसाधारण आहे. जगभरातून दुर्मिळ पक्षी आणि पर्यावरण अभ्यासक येथे येतात. मात्र, उजनी धरणाला प्रदुषणाचा धोका निर्माण झाला आहे. पुढील पिढीचे भविष्य अवघड होणार आहे. अशा वेळी युवकांनी जलरक्षणासाठी पुढे आले पाहिजे.
सुनील जोशी , संघटन, नमामी चंद्रभागा जलसाक्षरता यात्रा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)