उजनीच्या अधिकाऱ्यांवर काढला जाळ

बिजवडी- उजनी धरणाच्या पाणी वाटपात पाटबंधारे विभागाचे अधिकारी दुजाभाव करीत असल्याची तक्रार करीत पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांविरोधात संतप व्यक्‍त करीत त्यांच्या कारभाराची तक्रार पालकमंत्र्यांकडे केली.
पुणे-सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी धरण 100 टक्के भरल्याने त्याचे जलपूजन आज (शनिवारी) सकाळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर धरणाच्या विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर राग आवळला. याबैठकीला आमदार प्रशांत परिचारक, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे आदी उपस्थित होते. या हंगामात उजनी धरण आज 106 टक्के भरले आहे. धरण आणि साखळी क्षेत्रात होत असलेल्या पावसाने उशीरा का होईना धरण भरले. या धरणावर सोलापूर जिल्ह्याला पिण्याच्या आणि शेतीच्या सिंचनाचा मोठा आधार आहे. या पुढील काळात उजनीचे पाणी हे काटकसरीने वापरावे, पाण्याच्या वापराच्या आणि सिंचनाबाबत पालमंत्री देशमुख यांनी सोलापूर जिल्ह्यातील आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी आज प्रदिर्घ चर्चा केली असून, त्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत.
पालकमंत्री देशमुख म्हणाले की, जिल्ह्यातील औद्योगिक, शेती व पिण्याच्या पाणी वाटपाचे संतुलित नियोजन करणार आहे. पुणे-पिंपरी येथून उजनी धरणात सोडण्यात येणारे पाणी प्रदूषण मुक्त करण्यासाठीही प्रयत्न करणार आहे. दरम्यान, धरण 106 टक्के भरल्याने सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा वर्षभराचा प्रश्‍न मिटला आहे. दरम्यान, पालकमंत्री देशमुख यांनी उजनी धरण जलाशयाची पाहणी केली. धरणातील पाणीसाठ्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसह बळीराजाही समाधानी असल्याचे त्यांनी नमूद केले.

  • यंदाच्या वर्षी धरणाची वजा वीस पातळीत असताना पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे 106 टक्के भरले आहे. हे सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्यादृष्टीने आनंदाची बाब आहे. या पाण्याचे वर्षभराचे नियोजन करण्यात येणार आहे. सोलापूर शहरासाठी नेमके किती पाणी लागते याचे ऑडिट होणे गरजेचे आहे. त्याचे नियोजन झाल्यास शहराला दोन दिवसाआड पाणी पुरवठा शक्‍य आहे.
    – विजय देशमुख, पालकमंत्री, सोलापूर

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)