उच्चाधिकाऱ्यांना रोखल्याबद्दल भारताकडून पाकिस्तानचा निषेध

 पंजाबी यात्रेकरूंची भेट नाकारली, गुरुद्वाराचे दर्शनही घेऊ दिले नाही

नवी दिल्ली  – पाकिस्तानमधील शिख यात्रेकरूंना भारतीय उच्चाधिकाऱ्यांना भेटू न दिल्याबद्दल भारताने आज पाकिस्तानचा जोरदार निषेध केला. पाकिस्तानातील गुरुद्वाराच्या यात्रेवर असणाऱ्या भारतीय उच्चाधिकाऱ्यांना बळजबरीने माघारी पाठवण्यात आल्याचाही भारताने निषेध केला आहे.

-Ads-

सुमारे 1800 शिख यात्रेकरू 12 एप्रिलपासून पाकिस्तानातील धार्मिक स्थळांच्या यात्रेवर गेले आहेत. या यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी भारतीय दूतावासाने बैसाखीच्या निमित्ताने या यात्रेकरूंच्या भेटीचे आयोजन केले होते. मात्र उच्चायुक्‍त गुरुद्वारा पंजा साहिबच्या दर्शनाला गेले असताना त्यांना तेथून माघारी पाठवण्यात आले. नियोजनाप्रमाणे पंजाबी यात्रेकरूंना भेट घेऊ दिले गेले नाही. पाकिस्तानच्या या वर्तनाचे कोणतेही स्पष्टिकरण देता येऊ शकणार नाही. हे वर्तन म्हणजे मुत्सदेगिरीच्या संबंधांबाबत व्हिएन्ना ठरावाचे उघड उघड उल्लंघन आले, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. या संदर्भात भारताने पाकिस्तानकडे तीव्र निषेध नोंदवला आहे.

सुमारे दोन आठवड्यांपूर्वी भारत आणि पाकिस्तानने दोघांमधील मुत्सद्यांच्यापातळीवरील सर्व विषयांवर तोडगा काढण्याचे ठरवले होते. आपल्या उच्चाधिकाऱ्यांचा छळ होत असल्याची तक्रार दोन्ही देशांनी केली होती. त्यानंतर याबाबत उच्चाधिकाऱ्यांना सहकार्य करण्यात एकमत केले गेले होते. मात्र 12 एप्रिलला उच्चाधिकाऱ्यांच्या पथकाला भारतीय शिख यात्रेकरूंची भेट घेऊ दिली गेली नाही. तसेच 14 एप्रिलला या उच्चाधिकाऱ्यांना गुरुद्वारा पंजा साहिब येथे दर्शनही घेऊ दिले गेले नाही, आणि कोणतेही धार्मिक विधी करू दिले गेले नाहीत, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)