उच्चशिक्षित विवाहितेला मारहाण

पिंपरी – फ्लॅट खरेदीसाठी माहेराहून 32 लाख रूपये आणण्यास विवाहितेने नकार दिल्याने सासऱ्याने विवाहितेला शिवीगाळ करत मारहाण केली. वाकड पोलीस ठाण्यात पतीसह सासु-सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती अभिषेक अरविंद दळवी (वय-30, रा. अमित आनंद सोसायटी, पोलीस वसाहत, शिवाजीनगर, पुणे) याच्यासह सासू-सासरे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 31 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिषेक आणि फिर्यादी विवाहिता दोघेही उच्चशिक्षित आहेत. दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. अभिषेक आणि त्याची पत्नी दोन वर्षापूर्वी विमाननगर येथे आयटी कंपनीत एकत्र कामाला होते. त्यावेळी त्यांची मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कुटूंबियांच्या संमतीने दोघांनी लग्न केले. लग्नात विवाहितेच्या वडिलांनी एक तोळे सोने आणि इतर वस्तू दिल्या. त्यानंतर सासरच्या मंडळींनी फ्लॅट खरेदीसाठी माहेराहून 32 लाख रूपये आणण्याचा तगादा लावला. विवाहितेने फ्लॅटसाठी आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. त्यामुळे सासरे अरविंद यांनी विवाहितेला शिवीगाळ व मारहाण केली. सुरूवातीला हा गुन्हा वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. आता हा गुन्हा पुन्हा वाकड ठाण्यात वर्ग करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)