उच्चशिक्षित जोडप्याने लग्नाचा खर्च वाचवला

  • रामनदी परिसरात पाण्याची पातळी वाढवण्यासाठी दिला धनादेश

पिरंगुट – भूगाव (ता. मुळशी) येथील संजय नामदेवराव पवार आणि कोये (ता. खेड) येथील शिल्पा गणपतराव राळे या उच्चशिक्षित जोडप्याने आपला विवाह अगदी साधेपणाने करीत त्यातून वाचलेला पाच लाख रुपये निधी रामनदी परिसरातील जमिनीच्या पाण्याची पातळी वाढविण्यासाठी काम करत असलेल्या संस्थेला देण्यात आली.
रामनदी स्वच्छता अभियान समितीच्या वतीने रामनदी स्वच्छतेबरोबर नदीच्या खोऱ्यातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी एक कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या समितीबरोबर मंथन अध्ययन केंद्र व ऍक्वाडॅम या देशातील विविध नद्या आणि पाणी या विषयावर काम करणाऱ्या संस्था सहभागी आहेत. रामनदीच्या खोऱ्यात असणाऱ्या भूगाव, भुकूम आणि बावधन येथील 500 पेक्षा जास्त बोअरवेल, तसेच 100 विहिरींच्या शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्भरणाबरोबर या भागातील 3 छोट्या तलावातील गाळ काढण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या कामाची सुरवात करण्यासाठी खारीचा वाटा म्हणून शक्‍य तेवढी मदत संजय व शिल्पाने आज त्यांच्या विवाह प्रसंगी दिली आहे. लग्नातील खर्च वाचवण्यासाठी त्यांनी पत्रिका छपाईचा खर्च देखील टाळला आणि आपल्या आप्त-स्वकियांना फोन आणि एसएमएसद्वारे आमंत्रण केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)