उघड्या चेंबरमुळे आजारांचा प्रादुर्भाव

सातारा,दि.24 प्रतिनिधी- जिल्ह्यात एका बाजूला स्वाईन फ्ल्यूमुळे 18 जणांचे बळी व साथीचे रूग्णांची संख्या वाढत असताना दुसऱ्या बाजूला जिल्हा शासकीय रूग्णालयासमोरच असलेल्या गटारांच्या चेंबर हे झाकणा अभावी उघडी पडली आहेत. त्यामुळे रूग्णालय परिसरात दुर्गंधी पसरली असून आजारांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्‍यता निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर या परिसरात नर्सिंग कॉलेज देखील असून रोज अनेक विद्यार्थी त्या ठीकाणी शिक्षण देखील घेत आहेत. परिणामी सातारा पालिकेच्या आरोग्य व बांधकाम विभागाने तात्काळ गटारांच्या उघड्या चेंबरवर झाकणे बसविण्याची कार्यवाही करण्याची आवश्‍यकता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)