उघड्या अंगाने काट्यांच्या ढीगात भक्तांनी घेतल्या उड्या

गुळुंचेचा काटेबारसीचा थरार अनुभवण्यासाठी हजारोंनी केली गर्दी

नीरा – हर बोले हर हर महादेवच्या जयघोषात उघड्या अंगाने पाण्यात सूर मारावा त्याप्रमाणे काट्यांच्या ढिगात भक्तगणांनी उड्या मारून मंगळवारी (दि. 20) गुळुंचेच्या काटे बारस यात्रेची सांगता झाली. काटे बारसीचा हा थरार याची देही याची डोळा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्‍यातील गुळुंचे हे गाव काटे बार्शीच्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. ज्योतिर्लिंचे या देवस्थानला पुणे, सातारा अहमदनगर, कोल्हापूर या जिल्ह्यातून अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. याच गावातील व परिसरातील काही गावातील भक्तगण देवाच्या दर्शनासाठी जाण्यापूर्वी काट्यांच्या ढीगात उड्या घेत असतात. या गावातील ही परंपरा केव्हा सुरू झाली याबद्दल ठोक माहिती उपलब्ध नसली तरी सुमारे तीनशे वर्ष पेक्षा जास्त वर्षांपासून ही परंपरा आसल्याचे लोकांकडून सांगण्यात येते.
गुळुंचे येथील ज्योतिर्लिंग देवाची यात्रा ही कार्तिक शुद्ध द्वितीयेला घट स्थापनेने सुरू झाली होती. यानंतर पुढील दहा दिवस मंदिरामध्ये भजन, कीर्तन असे कार्यक्रम झाले. दहा दिवस येथील तरुण एकत्र येत रात्री ढोलाच्या तालावर लेझीमच्या साथीने छबिन्याचा खेळ रंगला. दहा दिवसांच्या या कार्यक्रमात गावकऱ्यांनी मोठ्या आनंदाने सहभाग घेतला. त्याच बरोबर गावातून कामानिमित्त बाहेर गेलेले लोकांनी ही यात्रा काळात देवदर्शन घेतले. काल कार्तिक शुद्ध एकादशीला देवाच्या मुखवट्याला नीरा नदीमध्ये स्नान घालण्यात आले. यावेळी नीरा गावातून ग्रामाप्रदिक्षाणा घालण्यात आली. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास देवाची काठी बहिणीच्या भेटीला गेली.
यानंतर मानकऱ्यांनी गेल्यावर्षी तोडून ठेवलेल्या बाभळीच्या काट्यांचे फास मंदिरा पुढील प्रांगणात टाकले. बहिण भेटीनंतर भक्तजन देवदर्शनासाठी मंदिराकडे येत असताना रस्त्यामध्ये काट्यांचा मोठा ढीग पार करण्याचे मोठे अवघड काम या भक्तांपुढे होते. मात्र, देव भेटीला आतुरलेले भक्तगणांनी ते अगदी लीलया पूर्ण केले. हर बोले हरहर महादेव, ज्योतिर्लिंग महाराज की जय अशा जय घोषामध्ये भक्तगणांनी या काट्यांच्या ढिगात उड्या घेतल्या. यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून हा रोमांचकारी क्षण अनुभवणाऱ्या भाविकांच्या अंगावर अक्षरशःकाटे उभे राहिले. यावेळी 162 भक्तांनी या काटे मोडवनात सहभाग घेतला.
कोणताही अनुचित प्रकार न घडता यात्रा शांततेत पार पडली. यावेळी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार राजेश माळेगावे, विजय वाघमारे व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यामध्ये 51 पोलीस कर्मचारी व 14 होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात होते. यावेळी गुळुंचे गावाचे पोलीस पाटील दिपक जाधव उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)