उखडलेल्या रस्त्यावर मुरूमाचा मुलामा

दैनिक प्रभातच्या वृत्तानंतर पीडब्ल्यूडी प्रशासनाला जाग

तळेगाव स्टेशन – तळेगाव दाभाडे येथील यशवंत नगर ते वराळे चौक रस्त्याची 9 सप्टेंबर रोजी दैनिक प्रभातमध्ये “रस्त्यावरील डांबर वर्षभरात उखडले’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली. रस्त्यावरील खड्‌डे मुरूम टाकून घेतले आहे. काही काळ का होईना नागरिकांनी समाधान व्यक्‍त केले आहे; परंतु काही दिवसांनी पाऊस पडताच टाकलेला मुरूम उखडेल, असे नागरिक बोलत आहेत.
प्रथम खड्ड्यात मुरूम, दगडगोटे व माती टाकली मात्र त्यावर मंगळवार दुपारपर्यंत रोलर न फिरवल्याने वाहनाच्या वर्दळीने दगड गोटे रस्त्यावर पसरले. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होऊन त्यांना आगीतून निघून फुफाट्यात पडल्याची अनुभूती येत आहे.

आता गणेशोत्सव काळात नागरिकांची, गणपती मंडळ वाहने, बस या गाड्यांची वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे रस्ता पुन्हा खराब होण्याची शक्‍यता आहे. तसेच या रस्त्याने जड वाहनांची संख्याही जास्त असल्याने रस्त्यावर खड्डे व रस्त्यावर खडी व माती लवकर जमा होते. त्याने दुचाकी घसरण्याची किंवा पावसाळ्यात पाणी साचल्यावर त्यात अडकण्याची शक्‍यता असते. तरी लवकरात लवकर रस्त्याचे डांबरीकरण करावे किंवा खड्ड्यावर रोलर फिरवून खड्‌डे चांगल्याप्रकारे बुजवावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)